Subscribe Us

zp teacher transfer letter 10 jun 2022 ग्रामविकास विभागाचे शिक्षकांच्या बदली बाबतचे CEO यांना आदेश दिनांक १० जून २०२२

 


ग्रामविकास विभागाचे शिक्षकांच्या बदली बाबतचे  CEO यांना आदेश दिनांक १० जून २०२२ 


ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद यांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया बाबत सविस्तर सूचना  पत्र आज दिनांक 10 जून 2005 रोजी निर्गमित केलेले आहेत 
या पत्रानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात  कार्यवाही दिनांक ७ एप्रिल २०२१  च्या शासन निर्णयानुसार करणेबाबत अवगत करण्यात आले 

 प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आले असून सदर प्रणाली चे अनावरण दिनांक 9 जून रोजी करण्यात आले आहे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या 2022 मधील जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा ऑनलाइन प्रणाली करण्यात येणार असून त्यासाठी खालील सूचना देण्यात आलेले आहेत
  •  जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या संगणक  प्रणाली ला सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच सर्व शिक्षकांना अवगत करावे व दररोज संकेतस्थळावर  भेट देऊन त्यानुसार सूचना  पाळाव्यात असे सुचवले आहे 
  • राज्यात covid-19 जिल्हा परिषदेचे संचमान्यता अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे  सन २०२२  शिक्षकांच्या बदल्या संचमान्यता२०२०-२१ विचारात घेऊन करण्यात यावा 
  • जिल्हा परिषदेच्या रोस्टर बिंदुनामावली विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडून तपासणी झालेली नाही नसल्यास शासन निर्णयातील तरतुदीनुसार या वर्षीच्या आंतरजिल्हा बदल्या साखळी पद्धतीने कराव्यात किंवा विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडून तपासून करून घेतले असेल त्यानुसार बदल्या कराव्यात 
  • काही शिक्षकांच्या बदल्या संदर्भात माननीय न्यायालयाने आदेश  असल्यास सदर आदेशाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे एखाद्या शिक्षकांची एका विशिष्ट शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली करण्याची माननीय न्यायालयाचे आदेश असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व संबधित  शिक्षकांची ऑफलाइन पद्धतीने बदली करावी
  •  परंतु काही शिक्षकांच्या न्यायालयीन प्रकरणे फक्त अर्जदार यांच्या संदर्भातील विनंतीचा विचार करण्याचे मान्य न्यायालयाचे निर्देश असल्यास असे शिक्षक बदली पात्र नसतील तरीही अशा शिक्षकांना ऑनलाइन बदली प्रक्रियेत भाग घेण्याबाबत लेखी करून द्यावे व त्यांची पोच ठेवावी 
  • आंतरजिल्हा बदली प्रकरणात बदलीपात्र शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये जायचे आहे त्या जिल्हा परिषदेत बिंदू नामावली नुसार पद रिक्त असल्याचे /भविष्यात रिक्त होणार असल्याचे नाहरकत प्रमाणपत्र  आहे अशाच शिक्षकांचा नाहरकत  प्रमाणपत्र धारक  शिक्षकात समावेश करावा सदर संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदली अर्ज केल्यास बदलीसाठी सेवाज्येष्ठता हा निकष असल्याने त्यांच्या सेवाज्येष्ठताप्रमाणे जेष्ठता  विचारात घ्यावी सेवाजेष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा  जन्मदिनांक एक  सारखी असल्यास  इंग्रजी आद्याक्षर  प्रमाणे आडनाव प्रथम प्राधान्याने विचार करण्यात यावा  
  • अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पदस्थापना सदर ऑनलाईन बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर करण्यात यावे

दिनांक १० जून २०२२  ग्रामविकास विभागाचे आदेश CLICK HERE

Post a Comment

0 Comments