पूर्व उच्च प्राथमिक इ. ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी रविवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची Scholarship Examination 2025 Interim Provisional Answer List Upper Primary 5th and Secondary 8th class
प्रसिद्धीपत्रक CLICK HERE
रविवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-
१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल.
२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन करण्याकरीता दिनांक ०४/०३/२०२५ ते ११/०३/२०२५ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.
४) दि. ११/०३/२०२५ नंतर त्रुटी आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
शिष्यवृत्ती परीक्षा - २०२५ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची / Interim Answer Key
Std 5th (PUP) CLICK HERE
Std 8th (PSS) CLICK HERE
ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-
दुरुस्ती Login लिंक CLICK HERE
१) विद्याथ्यर्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्म तारीख, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम व शाळेचे क्षेत्र इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ०४/०३/२०२५ ते ११/०३/२०२५ रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
असे परीक्षा परिषदेचे संजयकुमार राठोड उपायुक्त, महाराष्ट्र यांनी एका प्रसिध्दीपत्रक द्वारे कळविले आहे
0 Comments