Subscribe Us

संचमान्यता शासन निर्णयातील महत्त्वाचा दोष .......शिक्षक संघटनांनी लक्ष देण्याची गरज....sanchamanyata

 संचमान्यता  शासन निर्णयातील महत्त्वाचा दोष .......शिक्षक संघटनांनी लक्ष देण्याची गरज........


शासन दुरुस्ती करून तोंडाला पाणी पुसण्याची शक्यता....

संच मान्यता शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मान्यता करण्यात आलेले आहेत यामध्ये ज्याच्याकडे जाचक असे निकष लावण्यात आले आहेत त्यामुळे असंख्य शिक्षक पदे कमी होत असून भविष्यात भरती सुद्धा बंद होणार आहे अशातच शासन निर्णयातील महत्त्वाचा दोष दिसून येतो तो पुढील प्रमाणे........

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये उच्च प्राथमिक चे सहा ते आठ चे वर्ग आहेत त्यामध्ये काही ठिकाणी फक्त सहावा काही ठिकाणी सहावा व सातवा व काही ठिकाणी तीनही सहावा सातवा आठवा असे वर्ग आहेत शासन निर्णय तीनही प्रकारसाठी किती शिक्षक पदे मान्य होतील हे देण्यात आलेले आहेत

ते पुढील प्रमाणे 

  1. फक्त सहावा वर्ग व पट 10ते 35 असेल तर 1 शिक्षक
  2. फक्त सहावा व सातवा दोन वर्ग व पट 20 ते 70 असेल तर  2 शिक्षक 
  3. सहावा ,सातवा व आठवा तीनही वर्ग व पट 20 ते 60 असेल तर 2 शिक्षक 


वरील प्रमाणे शासन निर्णयात नमूद आहे 

  1. परंतु  सहावा व सातवा दोन वर्ग  तसेच  तीनही वर्ग  व पट 1 ते 19 असेल तर किती शिक्षक द्यावे हे नमूद नाही ?
  2. वास्तविक फक्त सहावा एकच वर्ग असेल व पट 10 ते 35 पर्यंत असला तर 1 शिक्षक देता येईल म्हणजे 10ते 20 पर्यत एक शिक्षक मात्र पुढच्या वर्गासाठी हा निकष नाही विरोधाभास असून    हा दोष शासन निर्णयात राहिला आहे व तो दुरुस्त करणे शासनास क्रमप्राप्त आहे 

सध्या राज्यस्तरीय विविध संघटना  निवेदन भेटून  दोन व तीन वर्गास 20 पटाखाली शिक्षक मान्य झाला नाही हे शासनाला सांगत आहे  

 शासन संच मान्यता निर्णयात दुरुस्ती करून 1 ते 20 विद्यार्थी संख्येस 1 शिक्षक मान्य करणार   ........ व संघटना याला आपली मागणी मान्य झाली अश्या पोस्ट येणार ....तसे आश्वासन मिळाले आहे..

मात्र याने प्रश्न सुटणार नसून  वर्ग 6 ते 8 तीनही वर्ग असतील तर RTE कायद्याप्रमाणे तीन विषय शिक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे 

 त्यासाठी 36 पटाला तीन शिक्षक हा जुनाच निकष कायम ठेवण्यात यावा हीच  आग्रही मागणी असणे आवश्यक आहे 

सर्व शिक्षक संघटनांनी  15 मार्च 2024 चा संचमान्यता शासन निर्णय रद्द करणे साठी प्रयत्न करावेत ही विनंती


रविंद्र नादरकर

जिल्हा सरचिटणीस

महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना बुलढाणा

Post a Comment

0 Comments