विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ जिल्हांतर्गत शिक्षक बदलीबाबत संपूर्ण माहिती टप्पा क्र.३
Complete information regarding intra-district transfer of special cadre teachers part-2४.३. टप्पा क्र.३ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांच्या बदल्या :-
४.३.१. टप्पा क्र.२ प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग-२ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.
४.३.२. जे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्र.४ मधील नमुन्यात स्वयंघोषीत प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.
४.३.३. जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करु शकेल.
४.३.४. उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपध्दती लागू होतील. या तरतुदींप्रमाणे संबंधिताची बदलीस पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक (one unit) मानून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा ३० कि.मी. परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अथवा संबधितांनी मागणी केलेल्या सोयीच्या ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण बदलीस पात्र सेवा झाली असल्यास त्या दोघांनाही बदलीस पात्र धरण्यात येईल.
(एक एकक म्हणून गणले जाईल परंतु तीन वर्षानंतर एकाने अर्ज करावयाचा की दोघाने अर्ज करावयाचाृ हे नमुद केलेले नाही कारण हे दोघेही ३० किमी च्या आत आल्यानंतर दोघापैकी एकाचे सध्याच्या क्षेत्रात १० वर्ष व सध्याच्या शाळेत पाच वर्ष पूर्ण झाल्यास तो बदलीपात्र होइल आणि त्यास खो बसेल.)
(३० किमीच्या आत आल्यानंतर सेवानियम पूर्ण करत असलेल्या एकाला खो बसु नये म्हणुन अर्ज करेल तेंव्हा एक युनिट म्हणुन अर्ज करावयाचा की सिंगल अर्ज करावयाचा की सुट मिळावी म्हणुन नकाराचा अर्ज करावयाचा याचा कोठेही उल्लेख नाही. २७/०२/२०१७ च्या शासननिर्णयानुसार एक युनिट म्हणुन दोघानाही बदली अर्ज करावयाची सुविधा देणे गरजेचे आहे तरच एक एकक म्हणुन बदली होइल )
४.३.५. विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून ३० कि.मी. अंतराबाबत सादर केलेले प्रमाणपत्र / दाखला याची पडताळणी गट शिक्षण अधिकारी यांचेद्वारा तालुकास्तरावर करण्यात यावी. ३० कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरच्या ३० कि.मी. रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील.
४.३.६. विशेष संवर्ग भाग-२ अंतर्गत बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
४.३.७. विशेष संवर्ग भाग-२ अंतर्गत लाभ घेणारे दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे
विशेष संवर्ग शिक्षक भाग -२ अर्जाचा नमुना विवरण पत्र ४ CLICK HERE
विशेष संवर्ग शिक्षक भाग पती-पत्नी एकत्रीकरण
(जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल
१.९ विशेष संवर्ग शिक्षक भाग २: पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण
एकमेकांपासून ३० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)
१.९.१ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर,
१.९.२ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर,
१.९.३ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर,
१.९.४ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/नगरपालिका
१.९.५ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी
१.९.६ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक / कर्मचारी असेल तर,
१.९.७ पती-पत्नी दोघांपैकी एक / दोघेही शिक्षणसेवक / तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर,
विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे.
विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असलेल्या शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन करून आपल्याला बदली पाहिजे असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होकार नोंदवावा जेणेकरून बदली यादी मध्ये आपले नाव समाविष्ट केले जाईल
व विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 नुसार पात्र असलेल्या शिक्षकाचे नाव बदली पात्र शिक्षक यादीमध्ये येत असल्यास व बदली नको असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर नकार नोंदवावा जेणेकरून आपले नाव यादीतून कमी केले जाईल
तसेच विशेष संवर्ग भाग 2 मध्ये दोन्हीही शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास ज्यांना आपल्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांनी वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर होकार नोंदवावा जेणेकरून त्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल
व ज्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांचा नकार नोंदवावा त्यांचे नाव यादीतून कमी करण्यात येईल
दोघांपैकी (म्हणजेच जोडीदारांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व एक इतर कर्मचारी ) एकच जण बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास एकानेच ऑनलाइन पोर्टलवर होकार नोंदवावा
विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो अर्थातच पसंती क्रमांक न दिल्यास नकार समजला जातो तरीसुद्धा पोर्टलवर नका देण्याचा प्रयत्न करावा हा मुद्दा GR प्रमाणे लागू होतो
विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.01/12/2022 ते 03/12/2022 (3 दिवस)
विशेष संवर्ग भाग 2 च्या वरील प्रमाणे होकार दिलेल्या शिक्षकांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा
परंतु आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास विशेष संवर्ग भाग 2 चे क्वचितच शिक्षक विस्थापित होऊ शकतात
विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना आपला जोडीदार ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्यातील कोणतीही शाळा निवडता येते परंतु दुसऱ्या तालुक्यातील निवडताना जोडीदाराच्या 30 किलोमीटर अंतरापर्यंतची शाळा निवडावी
विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात सुधारित शासन निर्णय दिनांक18 जून 2024 CLICK HERE (पिवळ्या शाईने हायलाईट केलेला भाग शासन निर्णयात नव्याने समावेश करण्यात आला आहे )
शासन निर्णयातील प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण पुढील लिंक वर आपल्याला वाचता येईल
जिल्हांतर्गत बदलीबाबत महत्त्वाच्या -व्याख्या १.१ ते १.१0 CLICK HERE
शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे CLICK HERE
बदली प्रक्रियासाठी शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे CLICK HERE
शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे CLICK HERE
टप्पा क्र.१ -बदली प्रक्रिया कार्यपध्दती CLICK HERE
टप्पा क्र.२ विशेष शिक्षकसंवर्ग भाग-१ शिक्षक बदली बाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र ३ -विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ शिक्षक बदलीबाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र.४ विशेष संवर्ग शिक्षक भाग-३ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र. ५ विशेष संवर्ग शिक्षक भाग-४ बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र.६ विस्थापित शिक्षकांसाठी CLICK HERE
टप्पा क्र. ७ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेसाठी राबवावयाचा CLICK HERE
जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE
बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार CLICK HERE
Vinsys IT Services Pvt Ltd चे बदली बाबत विचारलेल्या महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे ३ जून २०२२
0 Comments