Subscribe Us

शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे Publishing necessary information for intra-district transfers of teachers

 शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे Publishing necessary information for intra-district transfers of teachers


२. शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे:-

२.१ जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे परिशिष्ट-१ मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची व सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिध्द करतील.

२.२ प्रशिक्षण :- जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे आयोजित करतील.

२.३ शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे :-

२.३.१ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती निश्चित करतील. सदर कार्यवाही करीत असताना प्रथमतः मा. उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र.३२७८/२०१० बाबत दिनांक १३.९.२०१२ व दिनांक २१.११.२०१२ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने या भागातील रिक्त जागा निश्चित करण्यात याव्यात. त्यानंतर जिल्हयातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय शक्यतो सम प्रमाणात निश्चित करण्यात येईल. यामध्ये निव्वळ रिक्त असलेल्या जागा तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा दाखविण्यात येतील. त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी आहे, त्या जागा दाखविण्यात येतील.

२.३.२ समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनासाठी खुली करता येणार नाहीत.

२.३.३ अशाप्रकारे शाळानिहाय ठेवावयाच्या रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येईल.

२.३.४ शिक्षकांच्या बदल्या करीत असताना समानीकरणांतर्गत रिक्त ठेवाव्या लागणाऱ्या जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही

Teachers Transfer Update And GR शिक्षक बदलीसर्व महत्त्वाचे अपडेट व GR CLICK HERE

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात सुधारित शासन निर्णय दिनांक18 जून 2024 CLICK HERE  (पिवळ्या शाईने हायलाईट केलेला भाग शासन निर्णयात नव्याने समावेश करण्यात आला  आहे )

शासन निर्णयातील प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण  पुढील लिंक वर आपल्याला वाचता येईल 

जिल्हांतर्गत बदलीबाबत महत्त्वाच्या -व्याख्या १.१ ते १.१0  CLICK HERE 

 शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे  CLICK HERE 

बदली प्रक्रियासाठी शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे CLICK HERE 

 शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे CLICK HERE 

टप्पा क्र.१ -बदली प्रक्रिया कार्यपध्दती  CLICK HERE 

टप्पा क्र.२ विशेष  शिक्षकसंवर्ग भाग-१  शिक्षक बदली बाबत संपूर्ण  माहिती    CLICK HERE 

 टप्पा क्र ३ -विशेष संवर्ग  शिक्षक भाग-२  शिक्षक बदलीबाबत संपूर्ण माहिती   CLICK HERE  

 टप्पा क्र.४ विशेष संवर्ग शिक्षक भाग-३ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती   CLICK HERE 

 टप्पा क्र. ५ विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती    CLICK HERE  

टप्पा क्र.६ विस्थापित शिक्षकांसाठी   CLICK HERE

टप्पा  क्र. ७ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेसाठी राबवावयाचा   CLICK HERE

जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE 

 बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार CLICK HERE 

Post a Comment

0 Comments