ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष झाले परंतु शाळेवर 5 वर्ष झाले नाहीत अशा शिक्षकांना वरील मेसेज येत आहे.
![]() |
(विस्थापित शिक्षक (Eligible Round - 2) च्या याद्या Generate झालेल्या आहेत.लवकरचं वरिष्ठांच्या सुचने नुसार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ही फेरी पूर्ण होऊन सुद्धा जर अवघड भागातील जागा रिक्त राहत असल्यास सुगम क्षेत्रातील १० वर्ष सेवा पूर्ण केलेले आणि सदरील शाळेत ५ वर्ष पूर्ण न झालेल्या शिक्षकांची फेरी सुरू केली जाणार आहे.)
शासन निर्णयातील मुद्दा क्र 1 .10 - बदलीस पात्र शिक्षक :- बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पुर्ण झलेली आहे असे शिक्षक.
विन्सेस कंपनीतील कॉर्डिनेटर यांच्याशी फोनवरून सोमवार दिनांक - 21 नोव्हेंबर 2022 रोजी झालेली चर्चा. खालील विषय मांडण्यात आले व त्या संदर्भात त्यांनी काही माहिती सांगितली....
प्रश्न - एकाच शाळेत तीन वर्षे सेवा पूर्ण केलेले संवर्ग एक व दोन मधील शिक्षकांना बदली नको असेल तर पोर्टलवर नकाराचा फॉर्म कंपल्सरी भरावाच लागेल काय?
मिळालेले उत्तर - कंपल्सरी भरावा लागणार नाही परंतु भरलेला चांगले. नको म्हटल्यामुळे बदलीच्या प्रक्रियेत गणले जाणार नाही. त्यामुळे संवर्ग एक व दोन मधील शिक्षकांनी एकाच शाळेवर तीन वर्ष झाले असेल व बदली नको असेल तर बदली नको असल्याची नोंद करावी असे सांगण्यात आले. जर अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहिल्या तर शासन निर्णयातील दहा वर्ष सर्वसाधारण क्षेत्रात सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना शाळेतील सेवेची अट गृहीत न धरता अवघड क्षेत्रातील शाळांचे पदे भरावी लागणार या बदली प्रक्रियेत येऊ नये यासाठी बदली नकार दिला तर ते अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या बदली प्रक्रियेतही येणार नाहीत असे सांगण्यात आले.
शासन निर्णय मुद्दा ४.२.२. विशेष संवर्ग भाग-१ शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरुनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल, मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत आले असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र. ३ मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.
४.२.३. विशेष संवर्गांतर्गत विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील.
शासन निर्णय मधील विशेष संवर्ग 1 चे अर्ज विवरण पत्र सूट घेतली असल्यास बदली होणार नाही
प्रश्न - जर भरावाच लागत असेल तर असे शिक्षक फॉर्म भरताना अवघड क्षेत्रात बदली करणेस हरकत नसल्याचे डिक्लेरेशन येत आहे हे एक्सेप्ट केले तर त्यांची बदली अवघड क्षेत्रात होणार काय?
मिळालेले उत्तर - बदली होण्यास नकार नोंदवला असेल तर या बदली प्रक्रियेत कोठेच बदली होणार नाही.
शासन निर्णय मुद्दा क्र 4.2.6 विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांनी नकार दिला असल्यास ,बदलीतून सूट घेतली त्याची बदली होणार नाही ,होकार दिला असल्यास शाळांचे पर्याय भरला ती जागा न मिळाल्यास बदली होणार नाही
४.२.६. या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. या यादीच्या आधारे बदली करताना, शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये (तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने) बदली देता आली नाही तर त्याची बदली होणार नाही.
प्रश्न - एखाद्या शाळेत पाच वर्षे सेवा पूर्ण करणारे एकही बदली पात्र शिक्षक नाहीत पण त्या शाळेमध्ये एक पद समानीकरणात ठेवले असेल तर त्या शाळेतील शिक्षकांची बदली होणार काय? होणार असेल तर कोणाची होणार?
मिळालेले उत्तर - जिल्ह्यामध्ये दहा वर्षे सेवा व शाळेमध्ये पाच वर्ष सेवा पूर्ण झालेले शिक्षक शाळेमध्ये नसतील व जागा समानीकरणात ठेवली असेल तर तेथील एकाही शिक्षकाची बदली होणार नाही. कोणाचीही जबरदस्तीने बदली केली जाणार नाही असे सांगण्यात आले.
प्रश्न - एखाद्या शाळेत संवर्ग एक मधील शिक्षक बदलीस पात्र आहे इतर कोणीही बदलीस पात्र नाहीत अशा शाळेमधील एक पद समानीकरणात ठेवले असेल तर संवर्ग एक मध्ये असणाऱ्या शिक्षकाची बदली होईल काय ?नसेल तर कोणाची होईल?
मिळालेले उत्तर - संवर्ग एक मधील शिक्षक जिल्ह्यामध्ये दहा वर्षे सेवा पूर्ण व शाळेमध्ये पाच वर्ष सेवा पूर्ण असे बदली पात्र असतील आणि शाळा समानीकरणात ठेवली असेल इतर एकही शिक्षक बदली पात्र नसतील अशावेळी संवर्ग एक मध्ये असणाऱ्या शिक्षकांनी नकार दिला तर त्यांच्यासह शाळेतील कोणाचीही बदली होणार नाही. पण संवर्ग एक मधील शिक्षकांनी बदलीस होकार दिला तर त्यांची बदली होईल व ते पद रिक्त न दाखवता समानीकरणासाठी ब्लॉक केले जाईल असे सांगण्यात आले.
सर्व शिक्षकांना विनंती करण्यात येते की , आपण कुठल्याही अनधिकृत पोष्ट वर विश्वास ठेवू नये. बदली फॉर्म भरण्या अगोदर vincys कडून पोर्टलवर दिलेले अधिकृत विडीयो बघावे तसेच ग्रामविकास विभागाकडून निर्गमीत शासन निर्णय व शासन परिपत्रक यांचे काळजी पूर्वक वाचन करावे
0 Comments