शाळेवर तीन वर्षे पूर्ण न झालेल्या शिक्षकांना बदली टप्पा 7 अवघड क्षेत्रात सक्तीने बदली करता पात्र धरणे बदली कायद्याचे उल्लंघन करणारे
जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या शासन निर्णय 18 जून 2024 नुसार होत आहे याबाबतीत चे वेळा पत्रक जाहीर करण्यात आलेले असून त्यानुसार
Difficult Area List ( Random Round करिता पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे
शासन निर्णय दिनांक 18 जून 2024 मुद्दा क्रमांक 1.10 नुसार
ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात सलग सेवा 10 वर्ष पूर्ण झालेली असेल असे शिक्षकांची यादी.
याठिकाणी शाळेवरची सेवा विचारात घेतली जात नाही
सदर यादीमधील शिक्षक हे अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहिल्यास सेवाजेष्ठते प्रमाणे जागा भरणेकरिता Random Round टप्पा क्र 7 साठी पात्र ठरतात
वास्तविक *महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५, शासन अधिसूचना दि. २५.५.२००६ *प्रकरण दोन मधील कलम 3 नुसार पदस्थापनेचा पदावधी, बदली व बदली करणारे प्राधिकारी यातपदस्थापनेचा पदावधी. ३. (१) अखिल भारतीय सेवेतील अधिकारी आणि अ, ब आणि क गटातील राज्य शासनाचे सर्व सेवक किंवा कर्मचारी यांच्याकरिता एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी तीन वर्षांचा असेल* असे नमूद आहे सदर कायदा हा सर्व कर्मचारी यांचे साठी लागू आहे
असे असताना शासन निर्णयातील मुद्दा क्र 1 .10 - बदलीस पात्र शिक्षक :- बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पुर्ण झलेली आहे असे शिक्षक.
तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पुर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पुर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल .
याचाच अर्थ बदलीचा टप्पा संवर्ग १ २ ३ ४ च्या बदलीनंतर व ५ व्या विस्थापित चा टप्पा झाल्यावर अवघड क्षेत्रात जागा रिक्त राहिल्यास ६ व्या टप्प्यात बदलीपात्र ची अट शिथिल करून सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पुर्ण झालेल्या शिक्षकांना शाळेवर ५ वर्ष पूर्ण झालेले नसले तरी त्यांना सेवाजेष्ठता विचारात घेऊन अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल .
उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र हे अवघड क्षेत्रातील जागा प्रथम प्राधान्य ने भरण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत मात्र याउलट बदलीपात्र शिक्षक हे सर्व साधारण क्षेत्रात सेवाजेष्ठतेने आपल्या बदली पहिल्या पाच टप्प्यात करून घेतात त्यांची शाळा याच कालावधीत बदलली गेल्याने त्यांना अवघड क्षेत्रांच्या 7 टप्प्यासाठी पात्र धरले जात नाही *या उलट ज्या शिक्षकांना शाळेवर तीन वर्ष झाली नाही त्यांना प्रशासकीय बदली अवघड क्षेत्रातील बदली साठी पात्र ठरवले जात आहे हा सदर शिक्षकांवर अन्याय असून बदली कायदा 2006 चे उल्लंघन करणारा आहे*
*रविंद्र नादरकर*
*जिल्हा सरचिटणीस*
*महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना जिल्हा शाखा बुलडाणा*
0 Comments