इयत्ता १ लीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण वेळापत्रक जाहीर. (STATE TOT)
राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंमलबजावणीचे अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाची टप्प्याटप्याने अंमलबजावणी सन २०२५-२६ पासून करण्यात येणार आहे. त्याबाबत दि.१६/०४/२०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय व खाजगी अनुदानित शाळांतील इयत्ता १ लीच्या सर्व शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे. शैक्षणिक वर्ष माहे जून २०२५ पासून सुरु होणार असलेमुळे त्यापुर्वी हे शिक्षक प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता १ लीच्या सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण नियोजन पुढीलप्रमाणे आहे.
A. इयत्ता १ ली शिक्षकांच्या नवीन अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षणासाठी विषयांची निवडः
प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे एकूण ७ विषयांची निवड करण्यात आलेली आहे.
1. SCF-FS 2024,
2. मूल्यमापन व IIIPC पार्श्वभूमी व नमुना
3. भाषा शिक्षण 4. गणित शिक्षण 5. कला शिक्षण 6. आरोग्य व शारीरिक शिक्षण 7. कार्यशिक्षण.
B. प्रशिक्षणाचे माध्यमः
प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षण मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल. अन्य माध्यमांना मराठी माध्यमांसोबत सामावून घेतले जाईल.
C. प्रशिक्षणार्थी संख्या व वेळापत्रक-
प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयांच्या निर्धारित तासिका होण्यासाठी तीन दिवसांचे वेळापत्रक निश्चित केलेले आहे तसेच त्यासोबत महाराष्ट्र स्काऊट व गाईड संस्थेकडून एक दिवसीय बनी प्रशिक्षण देण्यात येईल.
जिल्हास्तर व तालुका स्तर प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी DIET यांचेवर असेल. त्यानुसार प्रशिक्षण स्थळ व तज्ज्ञांची निवड करणेबाबत आवश्यक पूर्वतयारी करावी. इ.१ली च्या ज्या शिक्षकांचे दि.०२ ते ११ जून, २०२५ कालावधील निवडश्रेणी प्रशिक्षण आहे त्यांचेसाठी नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दि.१३ ते १५ जून, २०२५ कालावधीत आयोजित करावे.
0 Comments