तक्रारी वरून होणार शिक्षकांची बदली जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या दिनांक १८ जून, २०२४ रोजीच्या धोरणात सुधारणा.Teachers will be transferred based on complaints. Improvements in the policy for intra-district transfer of teachers.
शासन निर्णय महाराष्ट्र शासन ग्राम विकासविभाग शासन पूरक पत्र क्रमांकः जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४ब२५, मर्झबान पथ, बांधकाम भवन,फोर्ट, मंत्रालय, मुंबई - ४०० ००१ दिनांक:- १४ मे, २०२५ नुसार हा बदल करण्यात आला आहे
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतच्या शासन निर्णय क्र. जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४, दि.१८ जून, २०१४ येथील दि.१८ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील अ.क्र. ५.१०.५ नंतर खालील अ.क्र.६ समाविष्ट करण्यात येत आहे.-
"६.
जिल्हा परिषद शिक्षकाची गैरवर्तणूकीबद्दल प्राप्त तक्रार:-
६.१ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणूकीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यास तक्रारी संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेऊन तक्रारीमधील गांभीर्य विचारात घेऊन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे संबधित जिल्हा परिषद शिक्षकास त्या पदावर ठेवणे योग्य नाही, असे मत झाल्यास, त्याबाबतची कारणमिमांसा नमूद करून, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४(४) (दोन) व ४ (५) मधील तरतूदीनुसार विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधीत शिक्षकाची बदली प्रस्तावित करतील.
६.२ अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर, त्यावरील उक्त नमूद कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी ३० दिवसांमध्ये पूर्ण करावी.
६.३ संबधित विभागीय आयुक्त, यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी नमूद केलेल्या कारणांची छाननी करून, अशा बदलीस ३० दिवसांच्या आतसहमती दर्शवावी. मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी सादर केलेल्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांची सहमती नसल्यास त्याबाबतची लेखी कारणे नमुद करणे आवश्यक राहील.
६.४ विभागीय आयुक्तांनी अशा शिक्षकाची तक्रारीवरून बदली करण्यास सहमती दर्शविल्यानंतर, सदर शिक्षकाची ऑफलाईन पद्धतीने बदली संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी अशी सहमती प्राप्त झाल्यापासून ७ दिवसात तातडीने करावी."
असा शासन निर्णय काढण्यात आला आहे
0 Comments