महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे मार्फत २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी NMMS परीक्षा 2024-25 चा जिल्हानिहाय व शाळानिहाय निवडयादी लॉगीनवर देण्यात आलेला आहे.
प्रसिद्धीपत्रक CLICK HERE
निकाल पाहण्यासाठी आपला रोल नंबर व आई चे नाव टाकून click Here वर टच करून टाका
To view Result touch link below and enter roll number and mother name
NMMS परीक्षा निवड यादी
पाहण्यासाठी वेबसाईट पहा CLICK HERE
NMMS निकाल पाहण्यासाठी सीट नंबर व आईचे नाव
टाकून निकाल पाहू शकता. CLICK HERE
अधिकृत वेबसाईट CLICK HE RE
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ.८ वी साठी परीक्षा दिनांक २२ डिसेंबर, २०२४ ची शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादीबाबत.
SUMMARY REPORT |
---|
A - DISTRICTWISE AVAILABLE QUOTA AND DETAILS |
B-DISTRICT WISE SELCTED STUDENTS |
C-VACANCY AFTER DISTRICT LEVEL SELECTION |
D-TRANSFER SELECTION |
E-TOTAL SELECTION COUNT (B+D) |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दि. २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी दि. ०७/०२/२०२५ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना /पालकांना शाळेमार्फत जात, दिव्यांगत्व, जन्म दिनांक इ. बाबतची दुरुस्ती असल्यास दि. १८/०२/२०२५ पर्यंत परिषदेकडे ऑनलाईन पाठविणेबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी पालकांनी शाळेमार्फत पाठविलेल्या दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी मंगळवार, दिनांक ०१/०४/२०२५ रोजी जाहीर करण्यात येत आहे.
दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षसाठी २४८७५८ विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११६८२ शिष्यवृत्ती कोटा शिक्षण मंत्रालय (MoE), नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी ४% आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व ८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हयानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. सदरची निवडयादी व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर मंगळवार, दिनांक ०१/०४/२०२५ रोजी पासून पाहता येईल.
सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घ्यावयाचा आहे.
शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचेमार्फत केले जाते.
(
0 Comments