शिक्षक प्रोफाईल सबमिट कसे करावे How to submit teacher profile on transfer portal?
PROFILE SUBMIT कसे करावे? संपूर्ण मार्गदर्शक CLICK HERE
सन 2024-25 च्या बदली प्रक्रिया बाबतीत सर्व कार्यरत शिक्षकांना प्रोफाइल अपडेट करून submit करणे आवश्यक आहे
सन 2024-25च्या बदली बाबतीत शिक्षकांच्या प्रोफाईल मध्ये सर्व माहिती तपासून घ्यावी
बदली पोर्टल वर जो मोबाईल क्रमांक नोंदणीकृत आहे त्यावर ओटीपी येण्यासाठी रिचार्ज बॅलेन्स असणे गरजेचे आहे..
https://ott.mahardd.com
▪️आपला मोबाईल नंबर टाकून Send OTP वर टच करा.
▪️आलेला OTP टाका व Captcha टाकून लॉगीन करा.
▪️Login केल्यानंतर OTP मोबाईल तसेच Email वर येतो.
▪️बदली पोर्टलवर लॉगीन झाल्यावर वरील डाव्या कोपर्यात तीन आडव्या रेषांवर टच करून Profile वर टच करा.
▪️आपली माहिती तपासून बघा.
▪️सर्व माहिती तपासून पहा.
▪️जी माहिती बदलायची आहे तेथे हिरव्या वर्तुळातील ✔️या चिन्हावर क्लिक करा. ❌असे चिन्ह दिसताच माहिती edit करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याचे दिसून येईल.
ज्या शिक्षकांची बदली ,पदोन्नती समायोजन याने सन 2023-24 च्या बदली मध्ये न बदलता त्यानंतर बदललेली आहे त्यांना सध्याच्या शाळेचा Udise व शाळा रुजू तारीख बदलणे आवश्यक आहे
🔸 Personal details बाबत..
सदर पेजवर आपणास सद्ध्या कोणताही बदल स्वतः ला करता येत नाही .... जिल्हा EO लेव्हल वरून बदल करून घेता येईल...उदा- नाव ,मोबाईल नंबर, शालार्थ आयडी, इमेल इ. बाबत
बदल करावयाची माहितीचा अर्ज मुख्याध्यापक शिफारस घेऊन पुराव्यासह गटशिक्षणाधिकारी यांचेकडे जमा करावा
🔸 Employment details बाबत
या मध्ये शिक्षकाने आवश्यक त्या ठिकाणी स्वतः विचारपूर्वक बदल करायचा आहे... एकदाच बदल करावयाची संधी यात आपणास उपलब्ध आहे. त्यानंतर SAVE करूनच शेवटी SUBMIT करावे.. आपण केलेला बदल शेवटी BEO लेव्हल वरून अंतीम करण्यात येईल.. या माहितीनुसार बदली होईल.(सदर पेजचा Screenshot काढून ठेवा)
यातील last transfer category मध्ये आपण सध्याच्या शाळेत कोणत्या बदली प्रकारातून आलात ते अगोदरच नमुद आहे... त्यात काही दुरुस्ती असेल तर करावी 🔸 Cadre 1...🔸Cadre 2... 🔸Entitled (अवघड क्षेत्र)..🔸 Eligible संवर्ग 4 सर्वसाधारण. यापैकी जे असेल ते .. आंतरजिल्हा असेल तर ज्या संवर्गातून झाला तो संवर्ग लिहावा..
याव्यतिरिक्त सध्याच्या शाळेत आपण समुपदेशन, समायोजन, प्रमोशन, डिमोशन निलंबन इ. कारणास्तव बदलून कार्यरत असाल तरN A निवडावे .. त्या शाळेत एक दिवस,एक महिना ,एकवर्ष झाले तरी..बदली झालीच असेल तर N A टाकावे last transfer category मध्ये व last transfer TYPE मध्ये N A टाकावे .
आपली प्रोफाईल माहिती मध्ये एखादी दुरुस्ती करावयाचे असल्यास खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
🔸 Current area joining date बाबत
आपण सध्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत ते क्षेत्रातील ज्वाईनिंग दिनांक
शेवटी दहा वर्षे सलग सोप्या क्षेत्रात वा अवघड क्षेत्रात आहात काय ? Yes/No करावे...... ( हा मुद्दा फक्त बदलीपात्र साठी येत आहे)
मागील दहा वर्षात निलंबन असल्यास Yes/No करावे..
खाली Save बटनावर क्लिक करा.
▪️आता Next बटनावर क्लिक करावे. या पानावर आपली सर्व माहिती Preview मध्ये दिसेल, सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे.
0 Comments