विशेष संवर्ग शिक्षक भाग-४ बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती टप्पा क्र. ५
Special Cadre Teachers Part-4 Transfers of Transferable Teachers Complete Information
बदलीस पात्र शिक्षक :- बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पुर्ण झलेली आहे असे शिक्षक. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पुर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पुर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल . (टप्पा क्र. ७ नुसार).
टप्पा क्र. ५ :- बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती
४.५ टप्पा क्र. ५ :- बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती :-
४.५.१. टप्पा क्र.१, २, ३ व ४ मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे, बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठतायादी, जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल.
४.५.२. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील.
४.५.३. या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राध्यान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील, त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते.
४.५.४. बदली प्रक्रीयेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल.
४.५.५. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र.४ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.
४.५.६ विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास, जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल
बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि. / /2025 ते / /2025 (3 दिवस)
- ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये सलग दहा वर्ष व शाळेवर सलग पाच वर्ष झाली अशा शिक्षकांना सेवा जेष्ठतेने किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये देणे अनिवार्य आहे
- बदली पात्र शिक्षकांना शक्यतोवर अवघड क्षेत्रातीलच शाळा मिळतील
- बदली पात्र शिक्षकांनी बदली करिता अर्ज करताना विवरण पत्र 1 मधील अ व आ पर्यायांपैकी आ पर्याय निवडणे सोयीचे होईल कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक हा प्रशासकीय बदलीस पात्र ठरेल
Teachers Transfer Update And GR शिक्षक बदलीसर्व महत्त्वाचे अपडेट व GR CLICK HERE
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात सुधारित शासन निर्णय दिनांक18 जून 2024 CLICK HERE (पिवळ्या शाईने हायलाईट केलेला भाग शासन निर्णयात नव्याने समावेश करण्यात आला आहे )
शासन निर्णयातील प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण पुढील लिंक वर आपल्याला वाचता येईल
जिल्हांतर्गत बदलीबाबत महत्त्वाच्या -व्याख्या १.१ ते १.१0 CLICK HERE
शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे CLICK HERE
बदली प्रक्रियासाठी शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे CLICK HERE
शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे CLICK HERE
टप्पा क्र.१ -बदली प्रक्रिया कार्यपध्दती CLICK HERE
टप्पा क्र.२ विशेष शिक्षकसंवर्ग भाग-१ शिक्षक बदली बाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र ३ -विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ शिक्षक बदलीबाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र.४ विशेष संवर्ग शिक्षक भाग-३ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र. ५ विशेष संवर्ग शिक्षक भाग-४ बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र.६ विस्थापित शिक्षकांसाठी CLICK HERE
टप्पा क्र. ७ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेसाठी राबवावयाचा CLICK HERE
जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE
बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार CLICK HERE
0 Comments