संवर्ग एकच्या शिक्षकांनी मोबाईल वरून नकार कसा नोंदवावा?
How to register a refusal from mobile by Category One teachers
( अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी बदली फेरी राबवण्यात येणार आहे . या फेरीमध्ये बदलीतून सूट मिळवण्यासाठी विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांनी अर्ज कसे भरावे याचे मार्गदर्शन या विडियो मध्ये केलेले आहे.)
अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याचा राऊंड करिता पोर्टल सुरू झालेले आहे संवर्ग एक मध्ये असलेल्या शिक्षकांनी कृपया आपला नकार पोर्टलवर नोंदवावा जेणेकरून आपली बदली अवघड क्षेत्रात होणार नाही
जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 मध्ये यापूर्वी जरी आपण नकार नोंदवलेला असला तरीही कृपया पोर्टलवर जाऊन लॉगिन करून पहावे शक्यतो यापूर्वी नकार नोंदवलेल्या शिक्षकांना पुन्हा नकार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही तरीही शहानिशा करण्याकरिता पोर्टल ओपन करून पहावे व जर नकार नोंदवता येत असेल तर नकार नोंदवावा
अत्यंत महत्त्वाचे नकार कसा नोंदवावा
ज्या शिक्षकांना बदलीतून सूट हवी असल्यास म्हणजेच नकार द्यावयाचा असल्यास किंवा असलेल्या शाळेवरून बदली नको असल्यास
खालील पोर्टल वरील विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर होय (Yes) नोदवावे
माझे नाव अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याच्या यादीत आले असून मला बदलीतून सूट हवी आहे ? --- होय Yes
संवर्ग एक चे शिक्षक बदली करिता नकार नोंदवणार आहेत म्हणजेच आहे त्या शाळेवरून बदली मागणार नाहीत त्यामुळे होकारासंदर्भात स्पष्टीकरण दिलेले नाही
टप्पा क्रमांक सात मधील शिक्षकांनी आपला नकार कसा नोंदवावा
संवर्ग १ मधील नकार देणे साठी स्टेप
1 ) खालील साईडला क्लिक करून लॉगीन करा
2 ) मोबाईल नं टाका
3 ) आलेला otp व captcha टाका
4 ) सूचना मराठीत पाहिजेत असतील उजव्या हाताला वरील बाजूस मराठी भाषा निवडा*
5 ) अस्वीकरण स्वीकारा*
6 ) डाव्या बाजूला दिलेल्या बाबीमधून जिल्हा अंतर्गत निवडा*
7 ) त्यातील अर्ज हा मुद्दा क्लिक करा
8 ) अर्जाचा प्रकार निवडा
9) अर्ज open झाल्यावर
10 ) तुम्हाला बदलीतून सुट हवी आहे का
11 ) Yes निवडा
12 ) त्या यादीतील अर्जदार संवर्ग १ मधील कोणत्या प्रकारात आहे ते निवडा
13 ) submit करा
14 ) पुन्हा आलेला otp पाठवा हा option टाकल्यावर
15 ) आलेला otp टाका
16 )त्यानंतर काही वेळातच आपल्या इमेलवर मेसेज द्वारे अर्जाची पीडीएफ प्राप्त होईल
महत्त्वाचे मुद्दे
अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरावयाच्या या टप्प्या मध्ये बदलीचा संदर्भ दिनांक 30 जून 2025 असेल
अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरावयाच्या टप्प्यामध्ये पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या वास्तव सेवा जेष्ठतेने म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्रातील सेवा जेष्ठतेने करण्यात येतील
सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची 10 अथवा 10 पेक्षा जास्त वर्षे सेवा झाली आहे या शिक्षकांना शाळेवरील सेवेची अट राहणार नाही अशा शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
नकाराची सुविधा खालील प्रकारचे शिक्षक घेऊ शकतील
जे शिक्षक संवर्ग एक मध्ये येत असून सुद्धा या बदली प्रक्रियेमध्ये त्यांना कार्यरत शाळेवर तीन वर्ष न झाल्यामुळे अर्ज करू शकले नाहीत असे शिक्षक या टप्प्यामध्ये नकार देऊन आपली बदली टाळू शकतात
ज्या शिक्षकांनी या बदली प्रक्रियेमध्ये बदली करिता होकार दिला होता परंतु त्यांना बदली मिळाली नाही अशा शिक्षकांची नावे या यादीमध्ये येऊ शकतात व ते नकार देऊन बदली टाळू शकतात
तसेच ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांना शाळेवर तीन वर्ष झाले असताना सुद्धा या बदली प्रक्रियेमध्ये होकार किंवा नकार नोंदवला नव्हता अशा शिक्षकांची नावे या यादीमध्ये येऊ शकतात असे शिक्षक सुद्धा या बदली टप्प्यामध्ये नकार नोंदवून बदली टाळू शकतात
विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांना आपण संवर्ग एक मध्ये येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील सादर केलेल्या प्रमाणपत्राची वैधता पडताळण्यासाठी 30 जून 2025 ही तारीख प्रमाणित धरण्यात येईल
ग्रामविकास विभागाचे पत्र वाचा CLICK HERE
सदर बदली टप्प्यांमध्ये खालील शिक्षकांचा समावेश होणार नाही
जिल्हातर्गत बदली प्रक्रिया 2025च्या बदली प्रक्रियेमध्ये यापूर्वी कोणत्याही संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांचा समावेश होणार नाही
ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांनी यापूर्वीच बदली प्रक्रियेमध्ये बदली करिता नकार दिलेल्या शिक्षकांचा समावेश या बदली टप्प्यामध्ये होणार नाही
तसेच याआधी बदलीपात्र शिक्षकाने, विशेष संवर्ग 1 मधून अर्ज भरताना बदलितून सूट हवी आहे का या प्रश्नाला नकार नोंदवला व पसंती क्रम न भरल्यामुळे त्या शिक्षकाची विस्थापित राउंडमध्ये बदली झाली
विशेष संवर्ग भाग एक च्या ज्या शिक्षकांनी बदली करिता होकार नोंदवून बदली घेतलेल्या शिक्षकांचा समावेश या बदली टप्प्यामध्ये होणार नाही
ज्या विशेष संवर्ग एकच्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झाले नाहीत अशा शिक्षकांचाही समावेश या बदली टप्प्यामध्ये होणार नाही
Teachers Transfer Update And GR शिक्षक बदलीसर्व महत्त्वाचे अपडेट व GR CLICK HERE
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात सुधारित शासन निर्णय दिनांक18 जून 2024 CLICK HERE (पिवळ्या शाईने हायलाईट केलेला भाग शासन निर्णयात नव्याने समावेश करण्यात आला आहे )
शासन निर्णयातील प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण पुढील लिंक वर आपल्याला वाचता येईल
जिल्हांतर्गत बदलीबाबत महत्त्वाच्या -व्याख्या १.१ ते १.१0 CLICK HERE
शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे CLICK HERE
बदली प्रक्रियासाठी शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे CLICK HERE
शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे CLICK HERE
टप्पा क्र.१ -बदली प्रक्रिया कार्यपध्दती CLICK HERE
टप्पा क्र.२ विशेष शिक्षकसंवर्ग भाग-१ शिक्षक बदली बाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र ३ -विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ शिक्षक बदलीबाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र.४ विशेष संवर्ग शिक्षक भाग-३ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र. ५ विशेष संवर्ग शिक्षक भाग-४ बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र.६ विस्थापित शिक्षकांसाठी CLICK HERE
टप्पा क्र. ७ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेसाठी राबवावयाचा CLICK HERE
जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE
बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार CLICK HERE
0 Comments