शिक्षकांना सृजन लेखमाला 2.0 साठी लेख पाठवण्याचे आवाहन
Teachers urged to submit articles for Srijan Lekhmala 2.0
सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांचे सृजन लेखमालाच्या पहिल्या अंकातील सहभागासाठी मनापासून आभार. ज्यांना सहभाग घ्यायचा होता, पण शक्य झाले नाही त्यांच्यासाठी संधी आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय प्राचार्य यांच्या संकल्पनेतून यावर्षी सुद्धा आपण लेखमाला प्रकाशित करणार आहोत.
त्यातील सर्व लेखांना नामांकित वृत्तपत्रातून प्रसिद्धी देणार आहोत, सन्मानपूर्वक त्याची एक प्रत सुद्धा सर्वांना देणार आहोत.
त्यामुळे दिनांक 31 मे 2025 पर्यंत आपले लेख
या इमेल वर थेट लिहून किंवा word स्वरूपात attach करून पाठवायची आहे. त्यातील फॉन्ट हा mangal किंवा युनिकोड स्वरूपातील असावा.
पीडीएफ स्वरूपातील किंवा कागदाचा फोटो या स्वरूपातील फाईल पाठवू नये.
ज्यांना तांत्रिक अडचणी आहेत त्यांनी व्हॉट्सअँप वरती टाईप करून पाठवली तरी चालेल. यासाठी 9511265198 या क्रमांकावर मेसेज करावा.
स्वरूप कसे असावे?
1. लेखाला शीर्षक दिलेले असावे.
2. वर्गातील अध्ययन/अध्यापन अनुभव, विशेष प्रसंग, शैक्षणिक साहित्य किंवा विद्यार्थ्यांशी संवाद, उपक्रम किंवा प्रकल्प याचे अहवाल लेखन, चिंतन आणि इतर शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल असे लेखन अपेक्षित आहे.
3. लेखन केवळ आकडेवारी, अहवाल स्वरूपातील न ठेवता वाचकाला रुचेल असे ठेवावे.
4. शेवटी लेखकाचे नाव, मोबाईल नंबर, इमेल, शाळेचे नाव इत्यादी तपशील द्यावा.
या सुट्टीच्या कालावधीत थोडा थोडा वेळ देऊन, लेख पूर्ण करूया. जास्तीत जास्त लेखांचा समावेश करण्यात येईल. आपल्या कार्याला चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल.
कोणतीही अडचण आल्यास समन्वयक तथा मार्गदर्शक श्री समाधान डुकरे सर (ज्येष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलढाणा) यांच्याशी संपर्क साधावा.
आयोजक व प्रेरणा :-
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलढाणा
शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा
0 Comments