Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ व २ यांनी विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण.....

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ / २ यांनी विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण.....




विनंती बदलीसाठी शाळेवर तीन वर्ष सेवा होणे आवश्यक  

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यातून प्रथमच विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यमान शाळेत किती वर्ष सेवा पूर्ण झालेली आवश्यक आहे, याबाबत खालीलप्रमाणे अधिक स्पष्टीकरण देण्यात येत आहे :-

विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद उक्त दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयात नमूद आहे. तसेच शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बदलीसंदर्भातील "महाराष्ट्र शासकीय कर्मचान्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ नुसार प्रचलितरित्या एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी तीन वर्षांचा असेल, अशी तरतूद आहे. तसेच, सदर नेमणूकीचा पदावधी पूर्ण केला असल्याखेरीज त्याची बदली करण्यात येणार नाही, असेही उक्त अधिनियमात स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्वान दि. ०७/०४/२०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूद विचारात घेता विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज करण्यासाठी अशा शिक्षकांची विद्यमान शाळेतील तीन वर्षांची सलग सेवा पूर्ण व्हावी, याकरिता सन २०२२ मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत दिनांक ३० जून २०२२ पर्यंत तीन वर्षे सलग सेवा झालेली आहे. असेच शिक्षक विशेष संर्वग शिक्षक भाग-१ आणि विशेष संर्वग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.



Post a Comment

0 Comments