Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या स्तनदा मातांना व गरोदर महिलांना त्यांच्या सोईनुसार पदस्थापना देण्याबाबत

  आंतरजिल्हा बदलीने आलेल्या स्तनदा मातांना  व  गरोदर महिलांना त्यांच्या सोईनुसार पदस्थापना देण्याबाबत  ग्रामविकास विभागाचे  दिनांक २० ऑक्टोबर २०२२ चे आदेश 



जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट  https://bit.ly/3n5wl9A

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४ २०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली आहे. तसेच, सन २०२२ या वर्षात आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत संदर्भीय दि. ३०/०८/२०२२ च्या शासन पत्रान्वये कळविण्यात आले आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना संबंधित जिल्हा परिषदांनी करावयाच्या कार्यवाहीबाबतची तरतूद संदर्भीय दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयातील परिच्छेद १३) व १४) मध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आली आहे. त्यामध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेल्या स्तनदा मातांच्या व गरोदर महिलांच्या बाबतीत पदस्थापना देण्याबाबतची विशिष्ट स्पष्ट तरतूद नमूद नाही.

 त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने आलेल्या स्तनदा मातांच्या व गरोदर महिलांच्या पदस्थापना देताना खालीलप्रमाणे कार्यवाही करावी :

३) विशेष संवर्ग भाग-१ या संवर्गातील शिक्षकांना, ज्याप्रमाणे संदर्भीय दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयातील परिच्छेद १४) मध्ये नमूद केल्यानुसार पदस्थापना देण्यात येते, त्याप्रमाणे आंतरजिल्हा बदलीने आलेल्या स्तनदा मातांना (संगोपनासाठी दोन वर्षाच्या आतील बालक असलेल्या) व गरोदर महिलांना त्यांच्या सोईनुसार पदस्थापना देण्यात यावी.


४) अशा स्तनदा माता (संगोपनासाठी दोन वर्षाच्या आतील बालक असलेल्या) व गरोदर महिला यांना यापूर्वी पदस्थापना दिली असल्यास, यापूर्वीची पदस्थापना बदलून देतानादेखील संदर्भीय दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयातील परिच्छेद १४) मध्ये नमूद केल्यानुसार त्यांच्या सोईनुसार पदस्थापना देण्यात यावी.

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या स्तनदा मातांना (संगोपनासाठी दोन वर्षाच्या आतील बालक असलेल्या) व गरोदर महिलांना पदस्थापना देताना वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.



Post a Comment

0 Comments